उत्तररंग
उत्तररंग परिषद
BMM2026 सिॲटल | ६ ऑगस्ट २०२६ म्हणजेच Day 0!
BMM2026 अधिवेशनाची एक उत्साही आणि संस्मरणीय सुरुवात!
अधिवेशनासाठी रजिस्टर केलेल्या ५५ आणि अधिक वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व्हेच्या प्रतिसादावरून उत्तररंग समिती अर्थपूर्ण कार्यक्रमाची आखणी करत आहे. आत्तापर्यंत खालील कार्यक्रम निश्चित झाले आहेत:
१. मस्त बिनधास्त चोवीस तास!
चोवीस तास ऊर्जा! उत्साह, उमेद आणि बिनधास्त जगण्याची प्रेरणा!
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचा एकपात्री कार्यक्रम.
बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांच्याशी संवाद | Maayboli२. 🧠 सुदृढ मेंदू, सक्षम वार्धक्य | विशेष पॅनेल चर्चा
Healthy Mind • Healthy Aging • Happy Living
वार्धक्यात मेंदूचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनाची गुणवत्ता जपण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी.
३. मराठी अंताक्षरी आणि बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी!
४. सुवर्ण वयातील प्रवास: पर्याय व नियोजन
५. आपलं घर की नवा पर्याय? एक मोकळा संवाद
Aging at home or moving on? Open conversation.
आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. 🙏
📧 अधिक माहितीसाठी या ई-मेल वर संपर्क करू शकता – uttarrang@bmmseattle2026.org