संगीत रस-सुरस
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेचा आणि उपशास्त्रीय संगीताच्या विविध भावछटांचा मनोहारी अनुभव म्हणजे ‘संगीत रस-सुरस’!
गानसरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांच्या तालमीत घडलेल्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, भावपूर्ण आणि कसदार गायकीतून रसिकांना स्वरांच्या अद्भुत विश्वात घेऊन जातील. रसिक श्रोते शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतासोबतच आरती ताईंनी गायलेल्या प्रसिद्ध सुगम संगीताचाही आस्वाद घेतील.
तबल्यावर श्री.प्रसाद पाध्ये आणि संवादिनीवर श्री.केदार नाफडे यांच्या समर्पक साथीने सजणारी ही मैफल म्हणजे अभिजात परंपरा, उत्स्फूर्त सर्जनशीलता आणि स्वरभाव यांचा सुरेख संगम असेल.
दोन तास स्वरांच्या वर्षावात चिंब भिजून, मनात दीर्घकाळ जपून ठेवावा असा अविस्मरणीय सांगीतिक अनुभव—‘संगीत रस-सुरस’!
